जतेत आझादी गौरव यात्रे,ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जत : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभर काढण्यात येत असलेल्या ‘आझादी गौरव यात्रे’त आज जत येथे कार्यक्रम झाला. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, तालुका अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, जिल्हा सदस्य महादेव पाटील, सरदार पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, माजी सभापती बसवराज बिराजदार, माजी पंचायत समिती सदस्य मल्लेशकत्ती,नाना शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत आदी उपस्थित होते.
दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसची आझादी गौरव यात्रा जाणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, तालुका स्तरावरून 75 किलोमीटर पर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेद्वारे काँग्रेसची विचारधारा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून केंद्रातील भाजप सरकारकडून होत असलेल्या सुडाचे राजकारणाबद्दल भूमिका मांडली जाणार आहे.
केंद्र सरकारकडून जीवनावश्यक वस्तुंवर कर लावून महागाईची भेट भाजपकडून दिली जात आहे. महागाई असो की भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस असो की इतर विरोधी पक्षांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास त्यंच्याविरोधात ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर करून दहशत निर्माण केली जात आहे. संविधानच धोक्यात आले असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.सर्व प्रकारची माहिती आझादी गौरव यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येणार आहे.

दरम्यान,महाराष्टात पोरखेळ सुरु झाला आहे. अतिशय नकारात्मकपणे बातम्या येत आहेत, त्यामुळे कितीही कटू असलं, तरी न्यायपालिकेला न्याय करुन लोकशाही वाचवली पाहिजे, राज्यपालांच्या अधिकारांच्या गैरवापरावर स्पष्टपणे नमूद केले पाहिजे. घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले त फिरवावे लागतील, पण राज्यातील लोकशाही वाचावीच लागेल, असे परखड मत काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी व्यक्त केलं आहे.
मोदी सरकारने आतापर्यंत भरमसाठ कर्ज काढलंय. आता नवीन कर्ज मिळेल असं वाटत नाही. देशात कर वाढवले आहेत. पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेल्या संस्था विकल्या जात आहे. नोट बंदी सुद्धा फसली आहे. अनेक अविचारी निर्णय केंद्र सरकार कडून घेतले जातं आहेत,असेही कदम म्हणाले.