दरीबडची येथील उपोषण आश्वासनानंतर मागे

0
संख,संकेत टाइम्स : दरीबडची येथील जिल्हा परिषद मराठी व कन्नड प्राथमिक शाळा सुधारण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.दरीबडची येथील जिल्हा परिषद मराठी व कन्नड प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या भिंतींला तडे गेले आहेत. भिंत फुगली आहे.

 

इमारत धोकादायक बनली आहे. निर्लेखन करण्याचा प्रस्ताव दीड वर्षांपासून दप्तर दिरंगाईत अडकून पडला आहे. शासनाने दखल न घेतल्याने दरीबडची ग्रामपंचायत सदस्य व पालकांनी बेमुदत उपोषणास सुरवात केली होती. इमारतींचे निर्लेखन करण्याचे भिजत घोंगडे पडले आहे.

 

प्रशासनाकडून वर्गखोल्या पाडण्याच्या आदेशास दिरंगाई होत आहे. या अनुषंगाने गटविकास अधिकारी दिनकर खरात यांनी उपोषणकर्त्यांची भेट देऊन शाळेचे काम एक महिन्यात पूर्ण करू, असे आश्वासन देऊन लेखी दिल्याने उपोषण मागे घेतले.

 

उपोषणास अमोगसिद्ध शेंडगे, रमेश मासाळ,राजेंद्र आटपाडकर, शिवानंद माळी, शिवानंद मोरडी, अमर जेऊर, विकास मोरडी, हणमंत मोरडी, अंबाण्णा माळी, संतोष चिकोडी, भीमू माळी, राम पुजारी, अनिल मदलमट्टी, शबीर मणेर, मारुती कांबळे, श्रीशैल पुजारी, राम
पुजारी, शिवनिंग जामगोंड उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.