25 वर्षांपासून तिरंगा फडकवणाऱ्या कुटुंबियांच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

0

कोल्हापूर : मागील 25 वर्षांपासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवणाऱ्या कोल्हापूर येथील अजित दरेकर यांच्या घरी जावून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले, तसेच कुटुंबियांशी संवाद साधला.

 

 

दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी श्री दरेकर घरासमोर तिरंगा फडकवतात, ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने श्री. दरेकर कुटुंबीय राबवित असलेल्या या उपक्रमात संपूर्ण देशवासिय सहभागी झाले आहेत.

Rate Card

या उपक्रमाची दखल घेऊन अमृत महोत्सवी वर्षात जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री दरेकर यांच्या या उपक्रमावर आधारित बनवण्यात आलेल्या चित्रफितीला मिळालेला उत्फुर्द प्रतिसाद ही देशभक्तीची भावना जागृत करणारा आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी दरेकर कुटुंबीयांच्या उपक्रमाचा गौरव केला. ‘आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकताना पाहण्यात खरा आनंद मिळत असल्याचे अजित दरेकर म्हणाले. यावेळी संगीतकार ऐश्वर्य मालगावे, अजित दरेकर व त्यांचे कुटुंबिय मित्रपरिवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.