आपल्या कसदार अभियानाने बॉलीवूड स्टार असलेली दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ सध्या आपल्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे खूपच प्रसिद्धी झोतात आहेत.
https://www.instagram.com/reel/Cb7bn_Mpay0/?igshid=YmMyMTA2M2Y=
गेल्या ६ वर्षापासून अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ एकमेकांना डेट करत आहेत. यादरम्यान टायगरचे नाव आता अभिनेत्री आकांक्षा शर्मासोबत जोडले जात आहे.चर्चेतील माहितीनुसार टायगर आणि आकांक्षाने अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम देखील केले आहेत.
https://www.instagram.com/p/CL5xE-QnOnv/?igshid=YmMyMTA2M2Y=
यावेळी जेव्हा टायगरला प्रश्न विचारला गेला तेव्हा टायगर म्हणाला कि यामध्ये काहीच तथ्य नाही.टायगर श्रॉफ आणि आकांक्षा शर्मा यांची भेट २०२० मध्ये आई एम अ डिस्को डांसर २.० या म्युझिक व्हिडीओ दरम्यान झाली होती.यानंतर दोघे कैसेनोवा म्युझिक व्हिडीओमध्ये देखील एकत्र दिसले. आकांक्षा शर्माबद्दल बोलायचे झाले तर तिने एक मॉडल म्हणून करियरची सुरुवात केली होती.
https://www.instagram.com/p/CJ-p0BmgD5p/?igshid=MDJmNzVkMjY=
२०२० मध्ये तिने साऊथच्या त्रिविक्रम चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये एंट्री केली होती.तेव्हापासून ती प्रसिध्द झाली आहे.याशिवाय ती महेश बाबू आणि वरून धवनसारख्या कलाकारांसोबत जाहिरातींमध्ये काम करताना देखील पाहायला मिळाली होती.आता टायगर श्रॉफ बरोबर चर्चेमुळे ती पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.




