..या मागण्यासाठी गटप्रवर्तकांनी केली सांगली जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

0

सांगली(हणमंत कोळी)

सांगली जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तकांनी विविध मागण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे,महाराष्ट्र मध्ये सन 2005 सालापासून राष्ट्रीय अभियानाची सुरुवात झालेली आहे. सुरुवातीपासून गटप्रवर्तक काम करीत असुन सध्या महाराष्ट्र मध्ये 3500 पेक्षा जास्त आहे. बहुतांश गटप्रवर्तक पदवीधर आहेत.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत त्यांना 11महिण्याची ऑर्डर दिली जाते नंतर दोन दिवस ब्रेक देऊन पुर्ववत वैद्यकीय अधिकारी यांच्या शिफारशी वर त्यांची पुनर्नियुक्ती केली जाते अशा प्रकारे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सर्व कंत्राटी कामगारांची नेमणूक केली आहे तरी सुध्दा राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कामगारांना दिलेले लाभ व अधिकार गटप्रवर्तक कंत्राटी असून तसा त्यांच्याबरोबर करार करुन सुध्दा कंत्राटी कामगारांचे हक्क गटप्रवर्तकांना शासन नाकारत असून महाराष्ट्र शासन या 3500 गटप्रवर्तकांवर दररोज अन्याय करीत आहे.
गटप्रवर्तकांना एन एच एम कडून करण्यात आलेल्या करारामध्ये फक्त प्रवास भत्ता दिला जाईल असे नमूद असते परंतु इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिला जाणारा 15 टक्के बोनस व 5 टक्के पगारवाढ गटप्रवर्तकांना नाकारली जात आहे. असे अनेक बाबतीत गटप्रवर्तकांच्या वतीने खालील मागण्याचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी मा दिलीप माने यांना देण्यात आले.

 

यावेळी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष कॉ .मिना कोळी,  कॉ उमेश देशमुख, कॉ हणमंत कोळी ,जिल्हा सचिव लता जाधव, राज्य सदस्य सुरेखा जाधव, जिल्हा सदस्य शबाना आगा, रुपाली महाडिक, वैशाली पवार, राजश्री सुतार, वनिता भुसनूर,संगिता माळी, सरिता पवार,इ सर्व जण उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.