संख(ता.जत) येथील आठवडा बाजार येथे दि.१५ ऑगस्ट रोजी दीड तोळ्याचे गंठण शंकर तुकाराम गुरव यांना सापडले होता.हे गंठण शंकर गुरव यांनी प्रामाणिकपणे संख पोलीस चौकीतील पोलिसांकडे दिले होते.गंठण सापडले बाबत गावातील नागरिकांना दवंडी देण्यात आली होती.ते गंठण सुशिला मारूती लोहार यांचे असल्याचे ओळख पटल्याने त्यांना ते देण्यात आले.
अधिक माहिती अशी,संखचा सोमवारच्या आठवडा बाजारात परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात.खरेदी करत असताना सुशिला लोहार यांचे गंठण हरविले होते.ते दुचाकी दुरूस्तीचे दुकानदार असणारे शंकर गुरव यांना बाजारातील खरेदी करत असताना सापडले होते.ते गंठण त्यांनी प्रामाणिक पणा दाखवत संख पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्याकडे दिले होते.पोलीसांनी केलेल्या आवाहना नुसार ते गंठण सुशीला मारुती लोहार यांचे असल्याचे समोर आले होते.
त्यांनी ओळख पटविल्याने ते गंठण त्यांना परत देण्यात आले. यावेळी पोली चौकीचे पोलीस नाईक ए.एम. हक्के,पोलीस नाईक आर. एस. बन्नेनवर, पोलीस कॉन्स्टेबल एस. व्ही.पांढरे यांच्याहस्ते सुशिला मारुती लोहार सापडलेले दीड तोळ्याचे गंठण परत देण्यात आले.