महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लवकरच स्वतंत्र वीज पुरवठा कंपनी; देशातील पहिलाच प्रयोग

0

मुंबई : मटा विशेष राज्यातील कृषी ग्राहकांसाठी अर्थात शेतकऱ्यांसाठी लवकरच स्वतंत्र पद्धतीने वीज पुरवठा होणार आहे. यासाठी ‘महाराष्ट्र कृषी वीज वितरण कंपनी लिमिटेड’ (एमएईडीसीएल) या नवीन कंपनीची स्थापना होणार आहे. यातून महावितरणचा भार हलका होणार असून, शेतकऱ्यांच्या विजेसाठीच्या स्वतंत्र कंपनीचा हा देशातील पहिलाच प्रयोग असेल. महात्मा फुले नूतनीय ऊर्जा व पायाभूत सुविध तंत्रज्ञान कंपनी (महाप्रीत) ही राज्याच्या सामाजिक न्याय विभागातील कंपनी प्रामुख्याने मागास घटकांच्या उत्थानासाठी कार्यरत आहे. परंतु कंपनीने आता विविध क्षेत्रांत विस्तार सुरू केला असून, नूतनीय ऊर्जाप्रसार हा त्याचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत कंपनीने महावितरणचा आर्थिक भार हलका करण्याचे नियोजन केले असून, लवकरच तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे.

 

यासंदर्भात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेसाठी मुंबईत आले असता, कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले, ‘महवितरणला कृषी ग्राहकांना १ रुपया प्रति युनिटने वीज द्यावी लागते. ही वीज ते ७ रुपया प्रति युनिटने खरेदी करतात. १ रुपया प्रति युनिट दराने देयक असताना तेदेखील विविध कारणांमुळे कृषी ग्राहकांकडून भरले जात नाही. महावितरणदेखील त्याची वसुली करू शकत नाही. यामुळेच आता महावितरणचा हा कृषी भार महाप्रीत स्वत:च्या खांद्यावर घेईल. महाप्रीतकडे मुबलक निधी आहे. त्यानुसार स्वतंत्र कंपनी स्थापन करून कृषी ग्राहकांना महाप्रीतकडून अखंडित सौर उर्जेचा पुरवठा केला जाईल.’

 

‘महावितरणच्या कमाल ३० हजार मेगावॉट वीज मागणीपैकी निम्मी वीज ही कृषी क्षेत्राला जाते. हे ध्यानात घेऊन महाप्रीत तीन टप्प्यांत प्रत्येकी ५ हजार मेगावॉट क्षमतेच्या तीन सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करेल. त्याद्वारे पुढील काळात १५ हजार मेगावॉट वीज सरासरी ३ रुपये प्रति युनिट दराने शेतकऱ्यांना पुरवली जाईल. महावितरणचा भार आम्ही आमच्या खांद्यावर घेऊ’, असेही श्रीमाळी यांनी स्पष्ट केले. महावितरणवरील भार हलका होणार महाराष्ट्रात राज्य सरकारी महावितरण कंपनी लिमिटेड ही सर्वांत मोठी वीज वितरक आहे. कंपनीचे जवळपास पावणे तीन कोटी ग्राहक आहेत.

Rate Card

 

त्यामध्ये कृषी ग्राहकांचा आकडा मोठा आहे. मात्र महावितरणच्या डोक्यावर ६० हजार कोटी रुपयांच्या देयक थकबाकीचा बोजा आहे. त्यातील सुमारे ४० हजार कोटी रुपयांची थकबाकी कृषी क्षेत्राची आहे. ही सर्व थकबाकी सामावून घेण्याची ‘महाप्रीत’ची क्षमता आहे. त्यामुळे महावितरणचा किमान ६० टक्के भार हलका होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.