मंत्री सुरेश खाडे यांच्याकडून जखमी अपूर्वा हिची विचारपूस
शिरोळ : दत्तवाड तालुका शिरोळ येथील कुमारी अपूर्वा अण्णापा शिरढोणे वय वर्षे 11 हिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिच्या शरीराच्या अनेक भागांचे लचके तोडले. आणि ती गंभीर जखमी झाली. शेतात काम करणाऱ्या आपल्या वडिलांना चहा आणि नाश्ता देण्यासाठी निघालेल्या अपूर्वावर नरभक्षक कुत्र्यांनी प्राण घातक हल्ला केला. जवळच शेतात काम करणारे शेतकरी आणि त्यांच्या वडिलांच्या प्रसंगावधानामुळे कुत्र्यांच्या तावडीतून तिला सोडवण्यात यश मिळालं.
तातडीने तिला दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण पुढील उपचारासाठी तिला सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. शरीरावरील जखमा हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या. तसे काही फोटोग्राफ्स व्हायरल झाले होते. ते फोटो व ही सर्व माहिती सैनिक टाकळी येथील फोटोग्राफर संदीप माने यांनी बेडग येथील मंत्री सुरेश खाडे यांचे कट्टर कार्यकर्ते आणि आरग-बेडग चे नेते आणि सैनिक टाकळी येथील फोटोग्राफर संदीप माने यांचे परममित्र उमेश पाटील(भाऊ) यांनी मंत्री सुरेश खाडे यांच्या निदर्शनास आणून दिली.

याची दखल घेऊन मंत्री महोदयांनी तात्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अपूर्वाच्या डॉक्टरांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून जखमी अपूर्वाची त्यांचे पालक व डॉक्टरांच्याकडे आस्थापूर्वक विचारपूस केली. आणि डॉक्टरांना सर्वतोपरी मुलीवर उत्तम दर्जाचे उपचार करण्याचे आदेश दिले.
