तीनच महिन्यांत पत्नीच्या अकाली मृत्यूचा धक्का | पतीचीही आत्महत्या

0

अथणी : झुंजारवाड (ता. अथणी) येथे विवाहानंतर तीनच महिन्यांत पत्नीच्या अकाली मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, २५ ऑगस्ट राेजी रात्री घडली. सदाशिव रामाप्पा कांबळे (वय २४) असे मृत पतीचे नाव आहे.

झुंजारवाड येथील सदाशिव कांबळे यांचा रूपा कांबळे (वय २१) हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी थाटामाटात विवाह झाला हाेता. काही दिवसांपूर्वी अचानक रूपा हिची प्रकृती बिघडली. तिला विषमज्वराचे निदान झाले. उपचारादरम्यान मंगळवार, २३ ऑगस्ट राेजी तिचा मृत्यू झाला. रूपाच्या मृत्यूचा माेठा मानसिक धक्का सदाशिवला बसला.

Rate Card

गुरुवारी सकाळी रूपाचा रक्षाविसर्जन विधी हाेता. रक्षाविसर्जनानंतर दिवसभर सदाशिव बेपत्ता हाेता. कुटुंबीय त्याचा शाेध घेत हाेते. रात्री कुटुंबीयांची नजर चुकवून त्याने घरातील एका खाेलीमध्ये पेटवून घेतले. अचानक घरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा येऊ लागल्याने हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी प्रथम अथणीत व पुणे विजापूरला नेले. मात्र, ८० टक्के भाजल्याने त्याचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.