मुलगा हवा म्हणून गर्भवती पत्नीचा गळा आवळून | बेशुद्धावस्थेत डोंगरात | फेकले,आटपाडीतील धक्कादायक प्रकार

0

सांगली : मुलगा होत नसल्याने पतीकडून गर्भवती पत्नीचा गळा दाबून तिला डोंगरामध्ये फेकून देत खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पत्नीचा गळा आवळल्यानंतर ती बेशुद्ध झाली पण तिला मृत समजून त्याने डोंगरामध्ये फेकून दिले.आटपाडीच्या काळेवाडी येथे ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पीडित पत्नीने पतीसह दोघांविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

प्रेमलता पदमिनी जिना( वय ३०) या गर्भवती महिलेचा पती कडूनच गळा दाबून तिला बेशुद्ध अवस्थेत मृत समजून डोंगरात फेकून दिल्याचा प्रकार आटपाडी तालुक्यातील काळेवाडी या ठिकाणी समोर आला आहे.या प्रकरणी पीडित पत्नी प्रेमलता जिना हिने पती पदीमनी जिना व संपत मामा नामक व्यक्तीच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

पदीमनी जिना,राहणार मुंबई याचे प्रेमलता यांच्याशी विवाह झाला असून त्यांना दोन मुली आहेत पण पदीमनी यांना मुलगा हवा होता त्यासाठी गर्भवती असणाऱ्या पत्नीला पोटात मुलगा आहे की मुलगी याची तपासणी करायचे असे सांगत तिला मुंबईमधून सातारा येथे आणले.त्यानंतर तिला संपत मामा नामक व्यक्तीच्या गाडीतून आटपाडीकडे घेऊन जात असताना पत्नी प्रेमलता हीचा दोरीने गळा आवळला.यामुळे पत्नी प्रेमलता ही बेशुद्ध झाली पण आपली पत्नी मृत झाल्याचे समजून त्याने पत्नीला बेशुद्ध अवस्थेत आटपाडी तालुक्यातील कोळीवाडी येथील चिंचघाट डोंगरात फेकून दिले.

Rate Card

 

मात्र,काही वेळानंतर प्रेमलता ही शुध्दीवर आली आणि त्यानंतर तिने गावात पोहचून आपल्या बाबतीत घडलेली गोष्ट सांगितली.त्यानंतर ग्रामस्थांनी आटपाडी पोलिसांशी संपर्क केला,त्यानंतर पोलिसांनी प्रेमलताला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून याप्रकरणी पदीमनी जिना आणि संपत या दोघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.