महात्मा गांधी वसतिगृहाची नविन इमारत बांधा : जिल्हा परिषदेवर मोर्चा

0

सांगली : जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी वसतिगृहाची इमारत 70 वर्षाची झाली असून ती धोकादायक बनली आहे तसा स्ट्रक्रचल ऑडिट चा अहवाल आला आहे त्यामुळे त्या‌ ठिकाणी सुसज्ज इमारत बांधा त्या ठिकाणी राहणाऱ्या विध्यार्त्याची पर्यायी सोय करा या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर आजी माजी विद्यात्यांनी गुरुवारी मोर्चा काढला

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुढी यांनी सुसज्ज असे नवीन वसतिगृह बांधू व या ठिकाणी राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्याची पर्यायी सोय अशी ग्वाही दिलीयावेळी महेश खराडे,अँड.अडव्याप्पा घेरडे अँड. माणिक पांढरे, प्रा.अजित हलिगळें, हरिदास लेंगरे, संजीव सावंत आदीसह अन्य उपस्थित होते

हा मोर्चा मार्केट यार्ड येथून जिल्हा परिषदेपर्यंत आला या ठिकाणी घोषणा नी संपूर्ण परिसर दणाणून सोडन्यात आला त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी व उपमुख्य कार्य कारी अधिकारी राहुल गावडे आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली महेश खराडे यांनी त्यांना सविस्तर वस्तुस्थिती सांगितली वसतिगृहात वीज नाही स्वच्छ ता नाही, त्याठिकाणी योग्य ती कार्यवाही करावी तसेच ही इमारत किती टक्के धोकादायक झाली आहे तो अहवाल खुला करावा खरोखरच राहण्या योग्य नसेल व ती धोकादायक बनली असेल तर विद्यार्थ्याची पर्यायी सोय करावी , त्या ठिकाणी सुसज्ज 500 विद्यार्थी राहतील असेल अशी नवीन इमारत बांद्यावी त्यात ग्रंथालय, अभ्यासिका, जिम, कॅन्टीन आदींची सोय करावी तसा प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घ्यावा स्मार्ट स्कूल क्या धर्तीवर स्मार्ट वसतिगृह योजना राबवावी अशी विनंती केली दूडी यांनी वसतिगृहाची इमारत धोकादायक बनली आहे तसा अहवाल आला आहे.

 

Rate Card

त्यामुळे ती इमारत पाडून नवीन बांधणे हाच त्याच्यावर पर्याय आहे सुसज्ज सर्व सोयींनी युक्त वस्तीगृहा्चा प्रस्ताव शासनाला पाठवतो आहे त्यात आजी माजी विद्यार्थ्यांच्या ही सूचना घेवू तसेच त्या काळात पर्यायी व्यवस्था ही करू त्यासाठी महापालिका , व अन्य शिक्षण संस्थांशी ही बोलू सामाजिक संस्था ची मदत घेवू विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली त्यांना सर्व मागण्याचे निवेदन दिले तसेच त्याच मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनाही देण्यात आले त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला

 

या आंदोलनात साहिल मुलाणी, जाधव, संदीप माळी विशाल शिंदें, समाधान रुपणर, रवी सदकाले, रावसाहेब राजमाने, आदिनाथ शिंदे,नाईकबा गिद्दे, सुशांत व्हणमाने, प्रफ्फुल कोकरे, सागर चव्हाण, हणमंत आत्पडकर, इराप्पा सरगर, शिवदास माने आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.