कवठेमहांकाळ : विद्यार्थ्यांच्या बौध्दीक विकासाबरोबरच दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण वैद्यकीय शिक्षण देण्यात सांगली जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील नूतन कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्षामार्फत सुविधा केंद्रास रितसर मान्यता मिळाली असल्याची माहिती प्राचार्य अमोल पाटील यांनी दिली.
नरसिंहगाव येथे राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्थेच्या वतीने नुतन फार्मसी कॉलेज सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण देणारे महत्वाचे केंद्र म्हणून नूतन कॉलेजकडे पाहीले जाते. विद्यार्थी वर्गाच्या सोयीसाठी प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी सुविधा केंद्र असणे गरजेचे आहे. त्यामुळेच संस्थेच्या वतीने सुविधा केंद्रासाठी पाठपुरावा केला होता. नुतन फार्मसी कॉलेजमधील असलेल्या विविध सुविधा, मार्गदर्शक प्राध्यापक व गरज लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्षामार्फत सुविधा केंद्रास रितसर मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नूतन माळी, सेक्रेटरी डॉ. रामलिंग माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. अमोल पाटील, उपप्राचार्य प्रमोद चिक्कोडी, विभाग प्रमुख प्रा. शरद कांबळे यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्षामार्फत सुविधा केंद्रास रितसर मान्यता मिळाली आहे. फार्मसी विभागाच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षातील प्रवेशासाठी नोंदणी करणे तसेच पुष्टीकरण करणेस परवानगी मिळाली असल्याने विद्यार्थी वर्गाची सोय झाली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी सोयीचे झाले आहे. सुविधा केंद्रास रितसर मान्यता मिळण्यासाठी प्रा. सुहास माने, सुजित वाघमारे, शरद कांबळे, संदीप शिंत्रे, विजय पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे प्राचार्य अमोल पाटील यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी फार्मसी प्रवेशासाठी नूतन फार्मसी कॉलेजमध्येसंपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य पाटील यांनी केले आहे.