कवठेमहांकाळ मध्ये शेकडो तरुणांचा राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश

0
कवठेमहांकाळ : तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सुमनताई आर.आर.(आबा) पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे युवानेते रोहीतदादा पाटील यांनी गेल्या काही वर्षापासून कवठे महांकाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक पाऊले उचलत प्रशासनास वेठीस धरून जनसामान्यांची अनेक कामे मार्गी लावली.

 

शहरातील नागरिकांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले.त्यांच्या याच कार्य करण्याच्या आणि शहराच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाला प्रेरित होऊन तसेच युवानेते रोहितदादा पाटील हेच कवठे महांकाळ शहराला विकासाच्या झोतात आणू शकतात,सर्वसामान्य नागरिकाना न्याय मिळवून देऊ शकतात हा विश्वास निर्माण झाल्याने शहरातील शेकडो तरुण कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षाचे युवानेते रोहीतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी बोलताना युवानेते रोहितदादा पाटील म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सर्व समाज घटकांना न्याय देऊ शकतो याचा विश्वास असल्यानेच आज इतक्या मोठ्या संख्येने तरुणांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.युवानेते रोहितदादा पाटील यांनी याप्रसंगी तरुणांचे पक्षात स्वागत करीत त्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी,कवठे महांकाळ नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करा आणि पक्ष संघटन बळकट करा असे आवाहन उपस्थित पक्ष प्रवेश केलेल्या तरुणांना केले.
यावेळी राष्ट्रवादी ओबीसीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी,युवक शहर अध्यक्ष महेश पाटील,नगरसेवक राहुल जगताप,संजय माने,अतुल पाटील यांच्या सोबत पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.