करजगीनजिक ओढापात्रावर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधावा | – सुभाष बालगाव

0
करजगी : भिवर्गी तलाव व गिरगाव तलाव भरल्यानंतर करजगी नजिकच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येेते, त्यामुळे शाळकरी मुले व नागरिकांना धोकादायक ओढा ओलांडून जावे लागत आहे.अनेक वेळा पाणी जास्तविभागाकडे  शाळकरी मुले,नागरिक वाहून जाण्याचा धोका आहे.त्यामुळे या ओढा पात्रावर तातडीने कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधावा अशी मागणी कॉग्रेस नेते सुभाष बालगाव यांनी केली आहे.
जत तालुक्यातल्या मोरबगी ते करजगी रस्त्यावरील ओढापात्रात पावसाळ्यात पाणी वाहते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्यासाठी पालकांना नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.करजगी जवळील रस्त्यावर ओढापात्रात वास्तविक कोल्हापूरी बंधारा बांधण्याची मागणी आहे.या बंधाऱ्यावरून या बाजूला असणाऱ्या बालगाव वस्ती,अक्कलकोट वस्ती,पट्टणशेट्टी वस्तीला  जाणाऱ्या मुलांना धोका पत्करून ओढापात्रातील पाण्यातून जावे लागत आहे.
करजगी व भिवर्गी तलाव भरल्यानंतर या ओढापात्रात मोठ्या प्रमाणात पाणी येते. यापुर्वी येथे बंधारा मंजूर झाला होता.मात्र पाण्यातून जाता यावे यासाठी नागरिकांनी येथे कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा बांधावा अशी मागणी केली होती.कारण त्यावर असणाऱ्या ५ फुटाच्या भिंतीवरून जाणे-येणे शक्य होते.मात्र याकडे लोक प्रतिनिधी संबधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे जादा पाणी येऊन अनेकदा मुख्य  गावासोबत संपर्क तुटतो. या मार्गावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज प्रवास करावा लागतो.त्यामुळे तातडीने कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा बांधावा अशी मागणी आहे.
संबधित विभागाकडे प्रस्ताव दिला आहे
या ओढापात्रात कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधावा अशी मागणी आमदार व संबंधित विभागाकडे केली आहे,तसा प्रस्तावही दिला आहे, अशी माहिती संरपच साहेबपाशा बिराजदार व  सुभाष बालगाव यांनी दिली.आता प्रशासनाने कारवाई करावी,असेही ते म्हणाले.
करजगी येथे शाळेला जाण्यासाठी लहानग्यांना असे ओढा पात्रातून जावे लागते.(छायाचित्र, कल्लण्णा बालगाव)
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.