माडग्याळच्या धनलक्ष्मी पतसंस्थेच्या चेअरमनपदी पाडूरंग निकम
माडग्याळ : माडग्याळ ता.जत येथील धनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थेच्या चेअरमनपदी गेली 40 वर्षे राजकारण व समाजकारणात अग्रेसरपणे काम करणारे पतसंस्थेच्या स्थापनेपासून संचालक व व्हा चेअरमन म्हणून काम केलेले, विद्यमान विकास सोसायटी सदस्य पाडूरंग नानासो निकम यांची तर व्हा.चेअरमनपदी संभाजी रामचंद्र सावंत यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.धनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सह.पत संस्थेची नुकतीच निवडणूक संपन्न झाली आहे. निवडणूक बिनबिरोध संपन्न होवून नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यामध्ये चेअरमनपदी पाडूरंग निकम व व्हा.चेअरमनपदी संभाजी सावंत यांची निवड करण्यात आली.
यावेळी संचालक भारत सावंत, शिवाजी घाटगे,सोमाण्णा हाक्के,रामदास सावंत, डॉ. चंद्रमणी उमराणी,सौ.कलावती जाधव,सौ.लोचना गायकवाड,यांच्यासह लक्ष्मण गायकवाड, बाबासाहेब जाधव,सचिव संजीव सावंत, महादेव जाधव,विलास घाटगे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना चेअरमन पाडूरंग निकम म्हणाले की, आम्ही माडग्याळ सारख्या ग्रामीण भागात अत्यंत प्रतीकुल परस्थितीतही सन 1996 पासून संस्था चालवत आहोत.सभासदांच्या व ठेवीदारांच्या पाठबळावर गेली पंचवीस वर्षे झाली संस्था यशस्वीरित्या कार्यरत असून छोट्या मोठ्या उद्योग धंद्यासाठी कर्ज वाटप करून परिसरातील नागरिकांना आर्थिक हातभार लावला आहे. संस्थेने कायमच सामाजिक कार्यात सहभागी होवून शेतकऱ्यांना मदत केली आहे.

तसेच सर्वाना सोबत घेऊन पतसंस्थेची प्रगती साधणार आहोत.व सभासदांना उत्तपद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष भारत सावंत म्हणाले की, कोरोनाच्या कालावधीत संस्थेची वसुली थोडी मंदावली आहे संस्थेला थकित कर्जातून बाहेर काढून संस्था पुर्व पदावर आनन्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी संस्थेच्या कर्जदारांनी संस्थेस आपआपली कर्जे भरून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.