जत शहरात शाखा असलेल्या मुंबईस्थित या संस्थेचा राज्यस्तरीय ‘दीपस्तंभ’ पुरस्काराने गौरव होणार

0

जत,संकेत टाइम्स : शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबईच्या सन  २१-२०२२ या वर्षासाठीच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेडचा, अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय ‘दीपस्तंभ’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Rate Card

हा पुरस्कार वितरण समारंभ उद्योगमंत्री उदय सामंत,सहकार मंत्री अतुल सावे, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतिश मराठे,उदय जोशी,(महामंत्री, सहकारभारती),विद्याधरजी अनास्कर(अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सह.बँक)यांचे उपस्थितीत दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी गणपतीपुळे येथे दुपारी १२.३० वाजता प्रदान करण्यात येणार आहे.

 

मुंबईस्थित शिवकृपा पतपेठीने आपला पारदर्शी कारभारामुळे संपुर्ण महाराष्ट्र आपला विस्तार वाढविला आहे.जत सारख्या निमशहरी भागातही संस्थेने अनेक व्यवसायिकांना मदतीचा हातभार ‌लावला आहे.राज्यभरातील संस्थेचा आलेख कौतुकास्पद आहे.सर्व नियम पाळत संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे,त्यांची दखल घेत हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.