मिरजेत पानपट्टी फोडल्याच्या रागातून एकाचा खून

0

मिरज: मिरज शहरातील स्टेशन रोड येथे पान टपरी फोडल्याच्या कारणातून तरुणाला बेदम मारहाण करत खून करण्यात आला.जीलानी इसामुद्दिन कुडचिकर( वय-४७,रा- बागलकोट,कर्नाटक)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी सराईत गुन्हेगार गणेश खन्ना नायडू (वय -३१ , राहणार – रॉकेल डेपो झोपडपट्टी,मिरज )याला महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक केली आहे.न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

अधिक माहिती अशी, गणेश नायडू व मयत जीलानी कुडचीकर हे दोघेही सराईत गुन्हेगार असून एकमेकांच्या ओळखीचे होते.स्टेशन रोडवर गणेश याची पान टपरी आहे.जीलानी कुडचीकर गुरुवारी रात्री गणेश याच्या पान टपरी जवळ आला.त्याने गणेशकडून काही रक्कम घेऊन निघून गेला होता.

Rate Card

याप्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित गणेश नायडू याला अटक केली आहे.पानपट्टी फोडून चोरी केल्याच्या संशयावरून तरुणाचा खून झाल्याने मिरज शहरात खळबळ उडाली आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.