जत शहरात मोटरसायकल व कंटेनर अपघातात एक जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

0

जत : शहरातील विजापूर गुहागर मार्ग लगतच्या सोलनकर चौक येथे एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने तिघांना चिरडले आहे. यात एक तरुण जागीच ठार झाला आहे. सतीश आप्पासाहेब माळी (वय २१, रा. जत) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातात सतीशचे मित्र मायाप्पा शिवाजी बर्वे (वय. ३२) व सागर बाळू धाईगडे (वय.२१) दोघेही( रा. जवळा ता सांगोला ) हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमीवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सोलंनकर चौक या ठिकाणी सांगोला जत राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सतीश माळी यांच्या मोटरसायकलला धडक दिली. सतीश व त्याचे मित्र हे शहरातून शेगावकडे जाणाऱ्या सांगोलेच्या दिशेने जात होते. यात सतीश हे कंटेनरच्या पाठीमागल्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाले. तर मायाप्पा बर्वे व सागर धाईगडे हे जखमी झाले.

 

 

दरम्यान, आपघात झाल्याचे समजताच येथे मोठी गर्दी झाली होती. सामाजिक कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी सतीश माळी यांना जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले , यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सदाकाळे यांनी माळी हे मयत झाल्याचे घोषित केले. तर यात गंभीर जखमी झालेले मायाप्पा बर्वे व सागर धाईगडे मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Rate Card

 

गंभीर जखमी झालेले दोघेही त्यांचे मित्र होते. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे.दरम्यान कंटेनर चालवणारा चालक हा फरार झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक लक्ष्मण बंडगर करत आहेत.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.