तासगावमधिल घरफोडी प्रकरणी एकास अटक

0
सांगली : तासगाव तालुक्यात घरफोडी प्रकरणातील सराईत चोरट्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.संदिप यशवंत पाटील (रा.लिंगनूर,ता.मिरज)असे संशयिताचे नाव आहे.तासगाव तालुक्यातील दोन घरफोडीचा छडा लागला आहे.संशयित संदीप पाटील हा घरफोडीतील मुद्देमाल विकण्यासाठी मिरजमधिल मिशन हॉस्पिटल येथे आला असता,त्याला सपोनि प्रशांत निशानदार यांच्या पथकांने पकडले.

 

Rate Card
त्याच्याकडे १ सोन्याचे गंठन,एक मंगळसुत्र,दोन पाट्या व कानातील टॉप्स,एक सोन्याचे वेढण,एक जोड चांदीचे पैजन,जोडवी,चांदीची मासोळी असा २,४०,५०० रूपयाच्या असा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.बारामती मधिल तीन गुन्ह्यात संशयित संदीप पाटील परागंदा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.