माडग्याळ जनावर बाजार बंद,उलाढाल ठप्प

0
माडग्याळ ; संपूर्ण राज्यातील दुभत्या जनावरांमध्ये पसरत असलेल्या लस्पी या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश दिलेत. त्याचा परिणाम माडग्याळ येथील जनावरांच्या बाजारावर झाला आहे.
लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेळी, मेंढ्या, या सर्व जनावरांचे बाजार होऊ शकले नाहीत.

 

शेळी, मेंढ्या, जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी माडग्याळचा जनावर बाजार प्रसिद्ध आहेत. बाजारात उमदी , उटगी, सोन्याळ, कोळगिरी, आंसगी, गोंधळेवाडी, घोलेशर, चडचण आणि कर्नाटकातील जनावरे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी येतात. जनावरांची खरेदी करणारेही मोठ्या संख्येने या बाजारास उपस्थिती लावतात. त्यामुळे दर शुक्रवारी किमान एक कोटी रुपयांच्या उलाढाल होते.शेंळा, मेंढ्याच्या बाजारातही मोठ्या प्रमाणात उलाढाल होते.लस्पी रोगाच्या साथीमुळे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे बाजार, वाहतूकवरही कडक निर्बंध आणले आहेत.

 

Rate Card
प्रत्येक शुक्रवारी भरणारा जनावर बाजार भरू शकला नाही. साहजिकच बाजारासाठी जनावरे घेऊन आलेल्या परगावच्या शेतकऱ्यांना गाडीतील जनावरांसह परत जावे लागले. खरेदीदारांनी बाजारकडे पाठ फिरवली. माडग्याळच्या दर शुक्रवारी जनावर बाजार मोठ्या प्रमाणात गर्दी असते. जनावरांच्या बाजाराला बंदी घातल्याने असा शुकशुकाट पसरला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.