शिराळ्यातील सराईत चोरट्यास अटक | 5 चोऱ्याचा उलघडा

0
सांगली : बुधगाव ता.मिरज येथील हनुमान मंदिर, सांगली येथील मदिना मशिदमध्ये चोरी व मोबाईलची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास पोलीसांनी पकडले.असिफ उस्मान डांगे (वय १९,रा.आरळा ता.शिराळा) असे संशयित चोरट्याचे नाव आहे, त्यांच्याकडून ५ चोऱ्याचा उलघडा झाल्याचे पोलीसांनी सांगितले.

 

संशयित असिफ डांगे हा स्टेशन रोड सांगली जवळ संशयास्पद फिरत असताना आढळून आला.त्यांच्याकडे पोलीसांनी तपास केला असता,त्यांने रत्नागिरी जिल्ह्यात चोरी केल्याची माहिती मिळाली त्यानुसार कसून तपासात बुधगावमधिल हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधिल रोख रक्कम चोरी केल्याची कबूली दिली.
संशयिताकडे ३ चोरीचे मोबाइल मिळून आल्याने जप्त केले आहेत.संशयित डांगे कडून ३० हजाराचे मोबाइल रोख ५२३ रूपये असा ३०,५२३ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस निरिक्षक अभिजीत देशमुख यांच्या पथकाने कारवाई केली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.