भक्त निवासासाठी २५० खोल्या,दोन मोठे अद्ययावत विश्रामगृह व दासोहकरिता मोठ्या हॉलची उभारणी | जत तालुक्यातील या देवस्थानचा गतीने

0
जत,संकेत टाइम्स : श्री दानम्मादेवी देवस्थान ट्रस्ट गुड्डापूर(ता. जत) या न्यासाची वार्षिक सर्वसाधारण सभा देवस्थानच्या शिवगंगा बिल्डिंगच्या सभागृहात देवस्थानचे अध्यक्ष सिध्दव्या स्वामी हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी व्यासपीठावर देवस्थानचेविश्वस्त चंद्रशेखर गोब्बी, रोहन गावडे,संतोष पुजारी, भीमाशंकर पुजारी, माजी अध्यक्ष विश्वनाथ गणी व ममदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

प्रारंभी सिध्दव्या स्वामी यांनी सर्वांचे स्वागत केले.आपल्या प्रास्ताविकामध्ये ते म्हणाले, १९५२ साली गुड्डापूर दानम्मादेवी देवस्थान ट्रस्टची नोंदणी झाली असून तेव्हापासून आजतागायत देवस्थानच्या घटना व नियमावलीनुसार विश्वस्त व पुजारी यांच्या समन्वयाने आदर्श कारभार होत असल्याचे सांगितले.महाराष्ट्र य कर्नाटकातील भक्तांच्या श्रध्दा व सहकार्यामुळेच भक्त निवासासाठी २५० खोल्या,दोन मोठे अद्ययावत विश्रामगृह व दासोहकरिता मोठ्या हॉलची उभारणी झाली असून भक्तांची चांगली सोय करण्यात आल्याचे सांगितले.विषयांचे वाचन देवस्थानचे सचिव विठ्ठल पुजारी यांनी केले.

 

यास सर्वांनी एकमताने मंजुरी दिली.यावेळी कर्नाटक सरकारच्या वतीने मंत्री शशिकला ज्वल्ले यांच्या पुढाकारातून बांधकामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिल्याबदल त्यांचे आभार मानण्यात आले. या सभेस औरंगाबादचे हायकोर्ट वकील लक्ष्मीकांत पाटील, सांगलीचे अँड. अप्पासाहेब घेरडे, व बिज्जरगी, सोलापूरचे कृष्णा हिरेमठ योगेश चडचणकर, महेश हिरेमठ आदी सभासद उपस्थित होते.
गुड्डापूर येथील श्री.दानम्मादेवी देवस्थानची वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.