उमदीत गुरूवारी ‘होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणी’चा कार्यक्रमाचे आयोजन | संरपच वर्षाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा

0
उमदी,संकेत टाइम्स : उमदीचे लोकनियुक्त संरपच सौ.वर्षाताई निवृत्ती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 

जत पुर्व भागाचे कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांचा समाजकार्य उमदीच्या पहिल्या लोकनियुक्त संरपच वर्षाताई शिंदे समर्थपणे पुढे नेहत आहेत.गेल्या पाच वर्षात सौ.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उमदीत मोठ्या संख्येने विकासकामे करण्यात आली आहेत.दरवर्षी सौ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

 

गतवर्षीप्रमाणे महिलासाठी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यकम २९ संप्टेबरला सायकांळी ५.०० वाजता ग्रामपंचायतीसमोर हा कार्यक्रम होणार आहे.सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका टिव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांचा हा होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा खास महिलासाठी कार्यक्रम होणार आहे. महिलांनी यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.