नवरात्र देवी विशेष | डफळापूरची कुलस्वामीनी श्री.एकविरा देवी

0
Post Views : 126 views
डफळापूरची कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिरात नवरात्र निमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.नवरात्रीत दररोज होणाऱ्या महा आरतीला महिलासह भाविकांची मोठी उपस्थिती असते.कोकणातून आलेली डफळापूरची एकविरा,खलाटीची लखाबाई(लक्ष्मी),साळमळगेवाडी महालिंगराया हे भांवड फिरत फिरत जत तालुक्यातील डफळापूर येथे आले.त्यावेळी एकविरा आईला तहान लागली.तीला तेथेच थांबवून लखाबाई व भाऊ महालिंगराया पुढे पाणी आण्यासाठी गेले, खलाटी नजिकच्या पाणी तळ असणाऱ्या बनात लखाबाई थांबली तर त्यांचे एकमेव बंन्धू साळमळगेवाडी महालिंगराया येथे थांबले.एकविरा देवी पाणी आणणाऱ्या भांवडाची वाट पाहत थांबली ती आजही त्यांची वाट पाहत आहे.यात्रा काळातील लिंबाच्या दिवशी मध्यरात्री लखाबाई व एकवीरा देवीची भेट होते.अशीही अख्यायिका आहे.

 

 

डफळापूर, खलाटी,साळमळगेवाडी या तिन्ही गावात या भांवडाची प्रसिद्ध मंदिरे स्थापन झाली आहेत.या मंदिरांना ऐतिहासिक महत्व आहे.मोठ्या भक्तांचे श्रंध्दास्थान दोन्ही देवी आहेत.भक्‍तांच्‍या संकटांना दूर करून त्‍यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी, स्‍वयंभू अशी ही एकवीरा देवी असल्‍याची भाविकांची श्रध्‍दा आहे. आपल्‍या पराक्रमाने तिन्‍ही लोकी नावलौकीक मिळविलेल्‍या परशूराम या वीरपुत्राची जननी म्‍हणून आदिशक्‍ती एकवीरा देवी ओळखली जाते. एकवीरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचीच रूपे असून देवीने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्‍याची धारणा आहे. जमदग्‍नी ऋषींची पत्‍नी असलेल्‍या रेणुका मातेचा परशुराम हा एकमेव वीर पुत्र असल्‍याने या देवीस ‘एक वीरा’ असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे एकवीरा म्‍हणून रूढ झाले.

 

महाराष्ट्र व कर्नाटक सिमेवरील डफळापूर येथील हे एकविरा देवीचे मंदिर असून भाविक येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्‍या परिसरात नित्‍यनियमित पूजा अर्चा आणि आरती अभिषेक करण्‍यात येतो.तर पौर्णिमा आणि आमावस्‍येच्‍या आदल्‍या दिवशी (चतुर्दशी) देवीला पंचामृत स्‍नान करून अभिषेक केला जातो. नवरात्रोत्‍सवाच्‍या काळात येथे मोठा उत्‍सव आणि जत्रेचेही आयोजन केले जात असते.

डफळापूर -बेंळूखी रोडवर हे एकवीरा मंदिर प्रसिद्ध आहे.कोकणानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हे एकमेव प्रसिद्ध मंदिर आहे.

 

जत,कवटेमहाकांळ,आटपाडी,मिरज,सांगली सह सिमावर्ती भागातील मोठ्या संख्येने भाविक येथे येतात.येथील देवीची यात्रा साधारणत: एप्रिल महिन्यात होते.यात्रा दोन दिवस असते त्याअगोदर पाच दिवस देवीला तेल लावण्याचा कार्यक्रम होतो.यात्रेच्या पहिल्या दिवशी नवसाचा कडक लिंब नेसण्याची प्रथा आहे.तर मुख्य दिवशी मंदिर भाविकासांठी खुले केले जाते.त्याच दिवशी देवीची पालखी डफळापूर येथील गुरव गल्ली येथील मानाच्या पाटील यांच्या घरी पुजा करून मंदिराकडे मिरवणूकीने नेहण्यात येते.तेथे पुर्ण दिवस पालखी थांबते.दुसऱ्या दिवशी परत पाटील यांच्या घरी व तेथून गुरव गल्लीतील पुजाऱ्यांच्या घरी आणली जाते.सध्या नवरात्री निमित्त होणाऱ्या देवीच्या पहाटेच्या आरतीला मोठ्या संख्येने भाविक येत आहेत.त्याशिवाय दिवसभरही भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
मंदिराचे बांधकाम सुरू 
प्रसिद्ध श्री एकविरा देवीसह लगतच्या परशूरामा मदिंराच्या शिखराचे बांधकाम गतीने सुरू आहे.गावातील भाविक,नागरिकांनी यासाठी देणगी गोळा करत बांधकाम सुरू केले आहे. देवीचे मुख्य मंदिरासह बाजूच्या मंदिरांचाही जीर्णोद्धार करण्यात येत आहे.भविष्यात या सुमारे ५ एकर क्षेत्रातील परिसरातील ऐतिहासिक मंदिराचा परिसर अलौकिक होणार आहे.मदिंराच्या बांधकामासाठी भाविकांनी मदत करावी,असे आवाहनही करण्यात आले आहे.
ऐतिहासिक तलाव 
एकविरा मदिंराच्या समोर भाविकांना पाण्याची सोय व्हावी,म्हणून छोटा तलाव खोदण्यात आला आहे. तेथे मोठ्या दुष्काळातही पाणी साठा होता.या तलावालाही ऐतिहासिक महत्व आहे.
डफळापूर येथील ऐतिहासिक मंदिरांचे बांधकाम सुरू आहे,मदिंरातील मनमोहक मुर्ती,मदिंरालगत असणारा ऐतिहासिक तलाव
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.