शेगावचे लक्ष्मण बोराडे सर ‘सकाळ आयडॉल’ पुरस्काराने सन्मानीत

0
शेगाव(रोहित माने) : येथील शिवशंभो मल्टिस्टेट निधी कंपनीच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील गरजूंना व तरूण युवकांसाठी व्यावसायीकांसाठी अल्पावधीतच सेवा देणारी निधी बँक अधिक तत्पर सेवेसाठी लवकरचं सज्ज करणार असल्याची माहिती,चेअरमन लक्ष्मण बोराडे यांनी दिली.
शेगाव ता.जत येथील शिवशंभो मल्टिस्टेट निधी बँकेची भव्य इमारात
शेगाव ता.जत येथील शिवशंभो मल्टिस्टेट निधी बँकेची भव्य इमारात
नुकताच त्यांना सकाळ समुहाकडून ‘सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी बोलताना त्यांना वरील उद्गार काढले.सदरचा पुरस्कार मिळताच कोल्हापूर येथे सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर,सकाळ माध्यम समुहाचे संपादक श्रीराम पवार यांचे शुभहस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी सहसंपादक शेखर जोशी व मान्यवर उपस्थित होते.
लक्ष्मण बोराडे हे गेली २५ वर्षे सामाजिक, राजकीय,सहकार क्षेत्रात शेगाव व परिसरात कार्यरत असलेले प्रमुख व्यक्तित्व आहे.गेली २२ वर्षे यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे संस्थापक,शेगाव नगरीचे ५ वर्षे संरपच,सर्व सेवा सोसायटीचे सलग १५ वर्षे संचालक,श्रीकृष्ण पतसंस्थेचे संस्थापक,चेअरमन म्हणून यशस्वी काम पाहिले आहे.

 

Rate Card
सामाजिक व आर्थिक संस्थाचा विकास साधून यशस्वी नेतृत्व करणारे चेअरमन म्हणून बोराडे यांचा गौरव सकाळ माध्यम समूहाने सकाळ ऑयडॉल ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन केला आहे. या पुरस्कारामुळे शेगावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.सध्या ते शिवशंभो मल्टिस्टेट निधी कंपनीचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत.बोराडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

पत्नी कांचन बोराडे यांची मोठी साथ

बोराडे यांच्या सौभाग्यवती कांचन बोराडे यांनी जिल्हा नियोजन समितीतही सदस्य म्हणून यशस्वी काम पाहिले आहे.लक्ष्मण बोराडे यांच्या यशात त्यांच्या मोठा वाटा आहे.जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्व:ताचा ठसा जनमाणसावर उमटवला आहे.

 

शेगाव : लक्ष्मण बोराडे यांना सकाळ माध्यम समुहाच्या वतीने ‘सकाळ आयडॉल’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.