नाशिकमध्ये खाजगी बसचा भिषण अपघात, ११ जणाचा मृत्यू
नाशिक: नाशिकमध्ये खाजगी कंपनीच्या ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला असून,अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या भिषण व दुर्देवी घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
बसचा अपघात होताच अगदी काही कळायच्या आत बसला आग लागली.काही मिनिटांतच बस जळून खाक झाली.काही कळायच्या आत बसमध्ये अडकलेले प्रवासी जिवंत होरपळून मृत्यूमुखी पडले.या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ११ जणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
