भिवर्गीत अल्पवयीन मुलीचा मृत्तदेह आढळला

0
करजगी,संकेत टाइम्स : भिवर्गी (ता.जत) येथील एका अल्पवयीन मुलीचा मृत्तदेह एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.कल्पना मल्लू तांबे (वय १७,रा.भिवर्गी) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,कल्पना तांबे हि शुक्रवारी घरातून कुणालाही न सांगता निघून गेली होती.तिचा कुंटुबियांकडून सर्वत्र शोध सुरू होता.आज रविवारी भिवर्गी फाट्या नजिकच्या विहिरीत तिचा मृत्तदेह आढळून आला आहे. पोलीसांनी मृत्तदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.

 

दरम्यान कल्पना हिने आत्महत्या केली का घातपात झाला यांचा पोलीसाकडून कसून तपास सुरू आहे.अधिक तपास पीएसआप शिंदे करत आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.