कवठेमहाकांळ : सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसाय कारवाई करा असे आदेश असताना कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे.
कवठेमहांकाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज तत्पर कारवाई करत तस्करीद्वारे हस्तिदंत विक्रीसाठी आलेल्या 4 व्यक्तीला अटक केली आहे. अटकेनंतर चौकशीदरम्यान त्याच्याकडून पोलिसांनी हस्तीदंत हस्तगत केले आहेत़. या 2 हस्तदंतांची आंतरराष्ट्रीय बाजारात 21 लाख रुपये किंमत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक जण शहरात हस्तिदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबूले पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांची मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक,अमिरशा फकीर, चंद्रसिग साबळे, केरूबा चव्हाण, विजय घोलप, सिद्धेश्वर कुंभार यांनी ही कारवाई केली.