खेराडे वांगीच्या तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

सांगली : खेराडे वांगी ता.कडेगाव येथील तलाठी मनिषा मोहनराव कुलकर्णी(वय ३७, रा. ब्राह्मणपुरी, इस्लामपुर ता. वाळवा)यांना १५ हजार रूपये लाच मागणी करून लाच स्विकारलेनंतर सांगली लाच लुचपत विभागने रंगेहाथ पकडले.तक्रारदार यांचे वडीलांची शासनाने पुनर्वसनसाठी जमीन संपादित करतेवेळी चुकलेली ७/१२ वरील आणेवारी दुरूस्त करून देण्याकरीता श्रीमती कुलकर्णी यांनी तक्रारदार यांचेकडे २० हजार रूपये लाच मागणी करीत असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि. ३० नोव्हेंबर रोजी अँन्टी करप्शन ब्युरो सांगली कार्यालयात दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांचे वडीलांचे शासनाने पुनर्वसन साठी जमीन संपादित करतेवेळी चुकलेली ७/१२ वरील आणेवारी दुरूस्त करून देण्याकरीता श्रीमती कुलकर्णी यांनी तक्रारदार यांचेकडे २० हजार रूपये लाचेची मागणी करून चर्चेअंती १५ हजार रूपये लाच मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर आज दि.१० ऑक्टोंबर रोजी गावकामगार तलाठी कार्यालय, खेराडे वांगी, ता. कडेगाव या ठिकाणी सापळा लावला असता श्रीमती मनिषा कुलकर्णी यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून १५ हजार रूपये लाच रक्कम स्विकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने श्रीमती कुलकर्णी यांचे विरुध्द कडेगाव पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.सदरची कारवाई सुजय घाटगे(पोलीस उप अधीक्षक दत्तात्रय पुजारी (पोलीस निरीक्षक) यांच्या पथकाने केली.