जिल्हा नियोजनचा निधी १०० टक्के खर्च करा : – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली : जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 (सर्वसाधारण) करिता 364 कोटी रूपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरिता 83 कोटी 81 लाख रूपये व आदिवासी घटक कार्यक्रमाकरिता 1 कोटी 1 लाख रूपये असे एकूण 448 कोटी 82 लाख रूपये नियतव्यय मंजूर आहे. माहे सप्टेंबर 2022 अखेर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मध्ये शासनाकडून एकूण 111 कोटी 42 लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला आहे. यामधील 37 कोटी 29 लाख रूपये इतका निधी खर्च झाला आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त झालेला संपूर्ण निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च करण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे, असे निर्देश कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. स्थगिती असलेल्या कामांपैकी अत्यावश्यक कामांना जनतेशी निगडीत कामांना सुधारणेसह मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार अरूण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार अनिल बाबर, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव व विक्रम देशमुख यांच्यासह कार्यान्वीत यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.