15 हजाराची लाच स्विकारताना जत पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्यासह सहशिक्षक लाचलुपतच्या जाळ्यात

0
Post Views : 2,442 views

जत,संकेत टाइम्स : लोकसेवक श्री रतिलाल मऱ्याप्पा साळुंखे, (वय ५२ वर्ष, सहाय्यक गट विकास अधिकारी जत, अतिरीक्त कार्यभार गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जत (रा. मु.पो. डोणज ता. मंगळवेढा जि. सोलापूर) व लोकसेवक कांत्ताप्पा दुंडाप्पा संन्नोळी, (वय ४२ वर्ष, उप शिक्षक जिल्हा परिषद कन्नड शाळा सिंधिहळ्ळ वस्ती, मुचंडी ता. जत,जि. सांगली, रा. बेलदार गल्ली, डॉक्टर हिट्टी बिल्डींग जत) यांनी ६०,०००/- रूपये लाचेची मागणी करून त्यापैकी १५,०००/-रूपये लाच स्विकारले नंतर रंगेहात पकडले. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची हि कारवाई केली आहे.

तक्रारदार यांनी अर्जीत रजा मंजूर होणेबाबतचा अर्ज गट शिक्षण अधिकारी जत यांना सादर केला होता.सदरची रजा मंजूर करून देण्यासाठी पंचायत समीती जत येथील गट शिक्षण अधिकारी साळुंखे यांनी व जिल्हा परिषद कन्नड शाळा सिंधिहळ्ळ वस्ती, मुचंडी ता. जत येथील उप शिक्षक संन्नोळी यांनी तक्रारदार यांचेकडे तिन महिन्याच्या रजेसाठी प्रत्येक महिन्याचे २०,०००/- प्रमाणे ६०,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज दि.०६.१०.२०२२ रोगी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ०६.१०.२०२२, दि.११.१०.२०२२, दि.१२.१०.२०२२, दि.१३.१०.२०२२ व दि.१४.१०.२०२२ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असून दि.१२.१०.२०२२ रोजी केले पडताळणी मध्ये लोकसेवक श्री.सनोळी उप शिक्षक यांनी तक्रारदार यांचेकडे ६०,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.दि.१४.१०.२०२२ रोजी केले पडताळणी मध्ये लोकसेवक साळुंखे, गट शिक्षण अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडे चर्चेअंती प्रत्येक महिन्याचे १५,०००/- रूपये प्रमाणे तीन महिन्याच्या अर्जीत रजेसाठी ४५,०००/- रूपये लाचेची मागणी करून एका महिन्याचे १५,०००/- रूपये लोकसेवक सत्रोली यांचेकडे देण्याबाबत सांगीतल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर दि. १४.१०.२०२२ रोजी जिल्हा परिषद कन्नड शाळा सिंधिहळ्ळ वस्ती, मुचंडी ता.जत जि. सांगली या ठिकाणी लोकरोवक श्री. सन्नोळी यांचे विरूध्द सापळा कारवाई आयोजीत केली असता सापळा कारवाई वेळी लोकसेवक सन्नोळी यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून १५,०००/- रूपये तक्रारदार यांचेकडून स्विकारले नंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

Rate Card

त्यानंतर लोकसेवक श्री.साळुंखे, गट शिक्षण अधिकारी यांना त्याचे घरी जात असताना उटगी येथील कळ्ळी वस्ती येथे ताब्यात घेतले आहे..त्या अनुषंगाने लोकसेवक श्री. रतिलाल मयप्पा साळुंखे व कांत्ताप्पा दुंडाप्पा संन्नोळी यांचे विरुध्द जत पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.सदरची कारवाई मा. श्री. राजेश बनसोडे सोो पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, श्री. सुरज गुरवसो, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखालीश्री. सुजय घाटगे, पोलीस उप अधीक्षक, श्री. विनायक भिलारे पोलीस निरीक्षक, श्री. दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, सिमा माने, धनंजय खाडे, संजय संकपाळ, प्रितम चौगुले, राधिका माने, चालक स्वप्नील भोसले यांनी केली आहे.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक,लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.

संपर्क :-
१) मोबाईल अॅप- www.acbmaharashtra.net
२) फेसबुक पेज – www.facebook.com-maharashtraACB
३) वेबसाईट – www.acbmaharashtra.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.