जतेत रविवारी लिंगायत माळी वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
जत,संकेत टाइम्स : जत तालुका लिंगायत माळी समाज संघटनेकडून रविवार ता.१६ रोजी लिंगायत माळी वधू-वर व पालक परिचय मेळावा-२०२२ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजेंद्र माळी यांनी दिली.
जत तालुका लिंगायत माळी समाज संघटनेच्या वतीने समाजातील विवाहेइच्छूक मुला-मुलींचे वैवाहिक प्रश्न सुकर होण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक व इतर राज्यातील लिंगायत माळी समाजातील मुला-मुलीकरिता हा वधू-वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.जत तालुक्यात प्रथमच मोठा वधू-वर व पालक परिचय मेळावा होणार आहे. नियोजित वधू-वरांची नोंदणीही या दिवशी होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कोळे मठाचे ३० वे मठाधिपती श्री.श्री.श्री. गुरूमुर्ती रूद्रपशूपती कोळेकर महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते होणार आहे.रविवार ता.१६ ऑक्टोंबरला सकाळी १० वाजता जत शहरातील शिवानुभव मंडप येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यात येताना विवाहेच्छुक मुला-मुलींचे २ फोटो व बायोडाटा आणावा,असे आवाहनही करण्यात आले आहे. जत शहरातील सुनीता लाईट हाऊस मार्केट यार्ड समर जत,रमेश माळी ९१४६३०२३९२ या नंबरवर संपर्क करावा.लिंगायत माळी समाजातील विवाहेइच्छूक मुला-मुलांनी पालकांसह उपस्थित रहावे,असेही आवाहन माळी यांनी केले आहे.