कवठेमहाकांळच्या महांकाली पतसंस्थेला आर्थिक वर्षात 91 लाखाचा नफा | – बाळासो गुरव यांची माहिती
Post Views : 100 views
कवठेमहांकाळ(सनी लोंढे) : कवठेमहांकाळ कायम दुष्काळाने होरपळणारा तालुका पूर्वी या ठिकाणी आजच्या एवढी प्रगती झालेली नव्हती लोकांच्या मध्ये जागरुकता नव्हती दळणवळणाची साधने सोयी-सवलती बँकिंग सोय कमी होत्या. तसेच बँकांचा विस्तारही झालेला नव्हता लोकांच्या लहान सहान गरजा भागवण्यासाठी अर्थपुरवठा उपलब्ध नव्हता.केवळ खाजगी सावकारांच्या वरती अवलंबून रहावे लागत असे अशावेळी कवठेमहांकाळ मधील जाणकार आणि पक्षविरहित लोकांनी एकत्र येऊन सामान्य लोकांचा विकास होण्यासाठी त्यांच्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करून श्री बाळासाहेब गुरव यांच्या संकल्पनेतून 101 सभासद संख्या 25 हजार भाग भांडवल व 36 हजार ठेवी या भांडवलावरती तालुक्यातील पहिल्या पतसंस्थेची स्थापना 2 जुन 1981 रोजी कै.गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते महांकाली नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.
संस्थेस सलग चार वर्षे राज्यस्तरीय बँको पुरस्काराने सन्मानित केले असून जिल्हा फेडरेशनचा आदर्श पतसंस्था पुरस्कारही मिळालेला आहे.संस्थेची आजची प्रगती ही थक्क करणारी आहे. स्थापनेपासून ऑडिट वर्ग ए असून एकूण 1931 इतके मार्च 2022 अखेर सभासद आहेत.संस्थेकडे 16 कोटी 35 लाख ठेवी असून 15 कोटी 89 लाख इतके कर्जवाटप झालेले आहे संस्थेकडे तीन कोटी 84 लाखाचा स्वानिधी असून खेळते भांडवल 23 कोटी वीस लाख इतके आहे चालू वर्षी संस्थेस 91 लाख 50 आज हजार इतका नफा झालेला आहे. संस्था विद्यानगर येथील शाखे सह स्वतःच्या भक्कम भांडवलावर व स्वतःच्या 4 मजली इमारतीत उभी असून सभासद व ग्राहकांच्या सेवेसाठी तप्तर असते. संस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम कै.विलासराव देशमुख ,कै.पतंगराव कदम व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


संस्था स्थापनेपासून सलग 35 वर्ष सध्याचे संचालक सुभाष विठोबा जाधव यांनी सचिव म्हणून काम पाहिले त्यांचाही या यशात मोठा वाटा आहे.सन 2017 च्या सेवानिवृत्तीनंतर दिनकर जोशी यांनी सचिवपदाची धुरा सांभाळलेली आहे. यापूर्वीच्या व सध्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेली कार्यतत्पर सेवा आजपर्यंतच्या सर्व संचालकांनी केलेली निस्वार्थी व त्यागी भावनेने केलेली सेवा एक मुखाने घेतलेले निर्णय हे संस्थेच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे संस्थेचा सभासद हा संस्थेचा आत्मा आहे त्यांचे कर्ज वसुलीसाठी मोलाचे सहकार्य आहे.त्यामुळे संस्थेची गेली 40 वर्षात कोर्टात एक ही वसुलीसाठी दावा दाखल केलेले नाही.

संचालक मंडळबाळासो पांडुरंग गुरव,आप्पा गणपती सगरे,शरद पंडितराव कोरे,सुभाष विठोबा जाधव,नामदेव गणपती माळी,अशोक आप्पासो पाटील,डॉ.दिलीप मारुती भस्मे,शंकर दर्याप्पा बंडगर,अरविंद लोकाप्पा माने,डॉ.विद्या हनमंत खोत,सौ.अर्चना मानसिंग दळवी
