१५ ऑक्टोंबर वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टाचा गौरव करणारा दिन | – प्रकाशराव जमदाडे 

0
जत,संकेत टाइम्स : पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोण सायकलवरुन तर कोण चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस यंदापासून ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून साजरा होत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा आमच्या कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस असल्याच्या भावना आहेत. वृत्तपत्र विक्रेत्याला समाजात सन्मान मिळावा,असे उद्गार जिल्हा बँक संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी काढले.

 

 

जत येथे वृत्तपत्र दिनानिमित्त शहरातील वृत्तपत्र विक्रेत्याचा प्रकाशराव जमदाडे युथ फांऊडेशन कडून फेटा,गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर दिवाळी गिप्ट देऊन सन्मान करण्यात आला.शहरात प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याने वृत्तपत्र विक्रेते भारावून गेले.

 

 

जमदाडे म्हणाले,धावपळीच्या जगात वृत्तपत्रांचं अस्तित्व आजही तितकंच महत्वाचं मानलं जातंय.काळाने सध्याच्या परिस्थितीत त्याच्यापुढे बरीच आव्हाने उभी केली असली तरी,आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यात वृत्तपत्रांना जे आज यश मिळतय,त्यात महत्वाची भुमिका जर कुणी बजावत असेल तर तो म्हणजे वृत्तपत्र विक्रेता.

सकाळी पहाटे साखरझोप विसरुन भुकेल्या पोटी,फक्त चहावर अर्ध्या झोपेतही आपले काम चोखपणे बजावणारे वृत्तपत्र विक्रेते आजही काही कमी नाहीयेत.येणा-या वर्तमानपत्रांची वर्गवारी करुन ती विभागुन ज्याच्यात्याच्याकडे वेळच्यावेळी अत्यंत कमी वेळात पोहचवणं,हे एकाग्रतेचं काम खरं तर तेच करु जाणोत.त्यातही एखाद्या प्रकाशनाची गाडी उशिरा आली तर पुन्हा डबल काम.अशा स्थितीत आपले काम प्रामाणिक करणाऱ्या या वृत्तमान पत्र विक्रेत्याचा आम्ही सम्मान केला आहे.यावेळी बाजार समितीचे सा.सचिव सोमनिंग चौधरी,श्री.नाटेकर,श्री.काशिद उपस्थित होते.
Rate Card
डिजीटलायझेशनच्या युगातही वृत्तमानपत्राचे महत्व
डिजीटलायझेशनच्या युगातही आपले महत्व वृत्तपत्रांनी अधोरेखित केलंय.आज उद्योगांस चालना देण्यासाठी,शिक्षणाची माहिती व प्रसिध्दी पत्रकाकरता,संस्कारक्षम लेखांकरता,राजकारण कट्टा,अर्थनीती समजावणारी वृत्तपत्रे,समाजकारणासाठीचं एक माध्यम म्हणून वृत्तपत्रांचं साम्राज्य आजही तितकंच अबाधित आहे.ते टिकविण्यात वृत्तपत्र विक्रेत्याचे योगदान न विसरणारे आहे,असेही जमदाडे म्हणाले.
जत शहरातील वृत्तपत्र विक्रेत्याचा प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशन कडून सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.