करजगी खाजा जिन्नेसाहेब दर्गाच्या ऊरूस मंगळवारपासून

0
Post Views : 9 views
करजगी : करजगी ता.जत येथील ऐतिहासिक असणाऱ्या खाजा जिन्नेसाहेब दर्गाच्या ऊरूसास मंगळवार पासून सुरूवात होत आहे. कोरोनानंतर होणाऱ्या हा ऊरूस मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा  कमिटीचे चेअरमन जीन्नेदपाशा उर्फ निसार मंजलेसो जुनेदी पटेल यांनी दिली आहे.

ऊरूस कार्यक्रम असे,मंगळावर ता.१८ रोजी दर्ग्यास गंध लेपणे,बुधवार ता.१९ रोजी नैवेद्य,सायकांळी डँनी अकँडमी सिंदगी यांचा रसमंजरी कार्यक्रम ,गुरूवार ता.२० रोजी ऊरूसाचा मुख्य दिवस,सायकांळी दगड उचलणे स्पर्धा, रात्री पालकी मिरवणूक,कौंटुबिक कन्नड नाटक जग मेच्छिद नायक हा करमणूकीचा कार्यक्रम होणार आहे.ऊरूसाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ऐतिहासिक महत्व असणारे ग्रामदैवत
करजगीचे ग्रामदैवत असलेल्या खाजा जिन्नेसाहेब दर्गाला ऐतिहासिक महत्व असून भक्ताच्या नवसाला पावणारे दैवत असल्याने मोठ्या संख्येने येथे भाविक येतात.दर्गाचा भव्य परिसर भव्यतेची साक्ष देतो.करजगीतील हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिक एकत्र येऊन ऊरूसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करतात.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.