स्व.वसंत चव्हाण यांच्यासारखे प्रामाणिक व्यवसायिक आमचे आदर्श | – राजेंद्र डोर्ले | सिध्दनाथ दुध संकलन केंद्राचा सन्मान व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

0
डफळापूर,संकेत टाइम्स : वसंत चव्हाण सारखे प्रामाणिक माणसाचा सहवास आम्हालाही लाभला.त्यांच्या प्रामाणिक पणामुळे त्यांनी हा व्यवसाय इतक्या उंचीवर नेहला आहे.त्यांच्या पश्चात त्यांचे चिरजिंव विशाल चव्हाण ही चांगल्या पध्दतीने काम करत आहे,त्यांनाही यापुढेही आमचे सहकार्य  राहील,असे उद्गार रांजेद्र डोर्ले यांनी काढले.

 

बेंळूखी येथील सिध्दनाथ दुध संकलन केंद्राला 8 महिन्यात सर्वाधिक 25 हजार लिटर दुध घालणाऱ्या महादेव कांरडेसह टॉप टेन शेतकऱ्यांचा चांदीची गणपतीची मुर्ती,मानाची पैठणी,टॉवेल टोपी, देऊन मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी डोर्ले डेअरीचे मालक राजेंद्र डोर्ले बोलत होते.

 

प्रवीण किराणा स्टोअर्सचे मालक प्रविण कोष्ठी,दुगाणे उद्योग समुहाचे मालक किरण दुगाणे,संतोष बंडगर,राजू माळी,शुभम बंडगर,शिवाजी चव्हाण,अतुल पवार,देवाप्पा बंडगर,सतीश हजारे, अमोल संकपाळ यांच्यासह जेष्ठ, युवा, व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अगदी सामान्य परिस्थितीतून आलेले स्व.वसंतराव चव्हाण यांनी दुध डेअरीवर कामगार म्हणून काम करत तब्बल ४ हजार लिटर दुध संकलन करून ही उद्योग यशस्वी केला होता.त्याशिवाय बेंळूखीचे लोकनियुक्त संरपच म्हणूनही त्यांनी एक वेगळा ठसा उमटविला होता.त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे चिरजिंव विशाल चव्हाण यांनी या डेअरीचा नावलौकिक कायम ठेवला आहे.त्यांनी सातत्याने दुध संकलन वाढवित नेहले आहे.यंदाच्या दिवाळीला पडत्या काळात साथ दिलेल्या सिध्दनाथ दुध संकलनाच्या केंद्राच्या सर्व सभासदांचा दिवाळी बोनस, मानाची पैठणी,टॉवेल टोपी व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्याशिवाय स्नेह भोजन, करमणूकीचा कार्यक्रमही संपन्न झाला.
Rate Card
आठ महिन्यात २५ हजार लिटर दुध
या डेअरीला सर्वाधिक दुध पुरवठा केलेल्या टॉपटेन दुध उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आठ महिन्यात तब्बल २५ हजार लिटर दुध पुरवठा केलेले शेतकरी महादेव अथणीकर सह पहिल्या तीन शेतकऱ्यांना चांदीची गणपतीची मुर्ती तर अन्य टॉपटेन मधिल ७ शेतकऱ्यांना चांदीची गणपतीची प्रतिमा,मानाची पैठणी,टॉवेल टोपी, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

डोर्ले उद्योग समुहाकडूनही बक्षिस
बेंळूखी येथील सिध्दनाथ दुध संकलन केंद्राच्या सर्वाधिक दुध पुरवठा केलेल्या तीन शेतकऱ्यांचा डोर्ले डेअरीचे मालक राजेंद्र डोर्ले यांनी ३,२,१ हजार रोख रक्कम देत गौरव केला.यापुढे अशा सर्वाधिक दुध पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना बक्षिस देऊ,असे आश्वासनही यावेळी डोर्ले यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.