दिवाळीत सोनेबाजाराला झळाळी,कोट्यावधीची सोने विक्री

0
Post Views : 258 views
जत,संकेत टाइम्स : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी सगळीकडे दिवाळीचा उत्साह दिसून येतोय. लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडून खरेदी करताना दिसतायत, बाजारपेठा पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेल्या आहेत. त्यातच दिवाळी म्हटलं की सोनं-चांदी खरेदीकडे कल दिसतो. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेक जण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. यंदा कोविड महामारीनंतरही सोनेबाजाराला झळाळी आली आहे.जत तालुक्यातील सराफ दुकानात मोठी गर्दी होती. काही कोटीची तालुक्यात सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

 

 

पुढील दोन दिवसातही मोठी सोन्याची विक्री होण्याचा अंदाज आहे यावर्षी लग्न सराईचे मुहूर्त आणि भावातील कमी जास्त चढ उतार यामुळे अजून सोने विक्री होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

सोन्यात गुंतवणूक करणं सुरक्षित आणि फायदेशीर मानलं जातं. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेक जण सोनं खरेदी करतात.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.