भारत जोडो यात्रेच्या माहितीसाठीच्या डिजिटल व्हॅनचे उद्घाटन

0
सांगली : अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या माहितीसाठीच्या डिजिटल व्हँनचे उद्घाटन आज सांगलीतील कर्मवीर चौकात करण्यात आले. यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील आणि शैलजाभाभी पाटील हे उपस्थित होते.
या व्हॅनमध्ये भारत जोडो यात्रेचे थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे, शिवाय यात्रेची इत्यंभूत माहिती कार्यकर्ते आणि नागरिकांना मिळणार आहे.यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला आत्तापर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. विघटनवादी शक्ती आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेला महाराष्ट्रातूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला पाहिजे, त्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा.

 

विशाल पाटील म्हणाले, भारत जोडो यात्रेची देशभर जोरदार चर्चा आहे. कार्यकर्ते आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ज्यांना यात्रेत येणे शक्य होत नाही, अशा लोकांना यात्रेची सविस्तर माहिती मिळावी, या उद्देशाने डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणारी यात्रा, चर्चा, सभा, भेटीगाठी याची संपूर्ण माहिती देण्याची व्यवस्था या व्हॅनमध्ये करण्यात आली आहे.
जयश्रीताई पाटील म्हणाल्या, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने खूप मोठी जागृती केली आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.यावेळी सिकंदर जमादार, फिरोज पठाण, मयुर पाटील, तौफिक शिकलगार, रविंद्र वळवडे, ताजुद्दीन शेख, अजित दोरकर, महावीर पाटील, बिपीन कदम, विशाल कलकुटगी, याकुब मणेर, ॲड. भाऊसाहेब पवार, मनोज लांडगे, विजय आवळे, गजानन अलदर, प्रताप चव्हाण, धनराज सातपुते, आप्पासाहेब पाटील, आशा पाटील, नंदाताई कोलप, क्रांती कदम, प्रतिक्षा काळे, नामदेव पठाडे, अल्ताफ पेंढारी, नामदेव चव्हाण, अल्बर्ट सावर्डेकर, अमोल पाटील, विश्वास यादव, डॉ. प्रताप भोसले, श्रीनाथ देवकर, आशिष चौधरी, राजेंद्र कांबळे, बाबगोंडा पाटील, अरूण पळसुले, प्रशांत अहिवळे, योगेश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
यात्रेत सहभागी होण्यासाठी फॉर्म भरा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ७ नोव्हेंबर रोजी ही पदयात्रा महाराष्ट्रात दाखल होत असून यामध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या सांगलीतील नागरिकांनी पक्षाने दिलेला फॉर्म अचूक भरून द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.