जतला आ.विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे अतिवृष्टीचे ५ कोटी ७२ लाख आले

0
जत : महाविकास तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या कार्य तत्परतेने व जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठ पुराव्यामुळे जत तालुक्याला ६ कोटी ९६ लाख रुपये अतिवृष्टी बाधित पीक नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. यातील ५ कोटी ७२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये
Rate Card
जिल्हयात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याची तात्काळ दखल घेत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले.शिवाय प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने पिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

याबाबत माहिती अशी की, गेल्यावर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये द्राक्ष,डाळींब, हरभरा, ज्वारी, भाजीपाला व इतर नगदी पिकांचा समावेश होता. याची दखल घेत महाविकास आघाडीचे तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पिकांच्या नुकसान भरपाईचे आदेश दिले होते. त्यानुसार कृषिविभाग व महसूल विभागाच्या वतीने पंचनामे केले.त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला. त्यानुसार जत तालुक्याला ६ कोटी ९६ लाख रुपये अतिवृष्टी बाधित पीक नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. यातील ५ कोटी ७२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले,असून उर्वरीत रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.