गुड्डापूर धानम्मादेवी कार्तिक यात्रेचा आज मुख्य दिवस
Post Views : 9 views
संख : जत तालुक्यातील गुडापूर येथील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या धानम्मादेवीची कार्तिक यात्रा २२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर अखेर भारणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस बुधवार २३ नोव्हेंबर कार्तिक अमावस्येच्या दिवशी आहे. मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता अन्न दासोह प्रसाद पुजा कार्यक्रम व आन्नदासोह शुभारंभ श्री.शिवाचार्य ष. ब्र. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी व सिध्दया स्वामी अध्यक्ष थानम्मादेवी देवस्थान ट्रस्ट यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
बुधवार २३ रोजी यात्रेचा मुख्य दिवस व सायंकाळी कार्तिक दिपोत्सव व पालखी उत्सव कार्यक्रम मंत्री सुरेश खाडे, कामगार मंत्री
महाराष्ट्र राज्य व खा. संजयकाका पाटील, आ.विक्रमसिंह सावंत,आ. विजयकुमार देशमुख माजी मंत्री सोलापूर व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.गुरुवार २४ रोजी सायंकाळी पाच वाजता कर्नाटक राज्याच्या मुजराई मंत्री सौ. शशीकलाताई आण्णासाहेब जोल्ले, चिकोडीचे खा.आण्णासाहेब जोल्ले, माजी उपमुख्यमंत्री कर्नाटक राज्यचे लक्ष्मण सवदी व सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत रथोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

