सांगली : सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार समर्थ भारत पवार टोळीस पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.सांगली शहर पोलीस ठाणेच्या हड्डीमध्ये यातील हद्दपारीत टोळी प्रमुख समर्थ भारत पवार,(वय २१)अक्षय सुनिल सुर्यवंशी (वय २० दोघे रा. राजीव गांधी झोपडपट्टी, सांगली, रोहित बाळू सपाटे (वय २० रा. इंगवले प्लॉट सांगली), रोहित मधुकर गोसावी (वय २२, रा. वाल्मिकी आवास, सांगली), संतोष अनिल सुर्यवंशी (वय २५, रा. राजीव गांधी झोपडपट्टी सांगली), प्रमोद लक्ष्मण माने, (वय २०, रा. काकानगर, सांगली)यांचा यात समावेश आहे.
या टोळीविरुद्ध सन २०१९ ते २०२२ मध्ये सांगली शहर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये घातक हत्यारानिशी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी,चोरी करणे, खंडणीसाठी इच्छापुर्वक दुखापत करुन शिविगाळी व दमदाटी करणे असे गंभीर स्वरुपाचे ९ गुन्हे दाखल आहेत.नमुद सामनेवाले हे कायदा न जुमाननारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवलोकन करून चौकशी अधिकारी अजित टिके यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल तसेच प्रस्तावाचे सुनावणी दरम्यानचा गुन्हा व त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, त्यांची सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन समर्थ पवार,अक्षय सूर्यवंशी,रोहित सपाटे, रोहित गोसावी,संतोष सूर्यवंशी,प्रमोद माने यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५९ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्था.गु.अ.शाखा सांगली, पोनि अभिजित देशमुख सांगली शहर पोलीस ठाणे, सपोफो/सिध्दाप्पा रुपनर, पोकॉ/दिपक गट्टे स्था.गु.अ.शाखा सांगली, तसेच पोना/ झाकीर हुसेन काझी, पोकों/अभिजित माळकर सांगली शहर पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.