नयना सोनवणे महिला नारीरत्न पुरस्काराने सन्मानित
Post Views : 2 views
जत ; जत येथील मनुश्री बहुउद्देशीय विकास मंडळाच्या अध्यक्षा नयना भास्कर सोनवणे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणेस्थित मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार देऊन पुण्यातील एका कार्यक्रमात गौरविण्यात आले.

मनुष्यबळ विकास लोकसेवा आकादमीच्यावतीने नुकताच पुणे येथे गुणिजन गौरव पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण झाले. या समारंभात नयना भास्कर सोनवणे यांनी मनुश्री बहुउद्देशीय विकास मंडळ (जत) या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात जे कार्य केले त्या कार्यासाठी त्यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण राज्यातून निवडक लोकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी ह. भ. प.श्यामसुंदर सोन्नूर महाराज प्रमुख पाहुणे होते. तज्ज्ञ मार्गदर्शक मोनिका यशोद, समाजसेवक तात्यासाहेब रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.