जत शिक्षणला पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी द्या ; दिगंबर सावंत 

0
17
जत : जत पंचायत समिती शिक्षण विभागाला पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी मिळावा अशी मागणी, जत तालुका शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनात म्हटले आहे की, जत तालुका हा विस्ताराने मोठा आहे मात्र याठिकाणी शिक्षक संख्या ही मंजूर पदापेक्षा कमी आहे,अनेक शाळात एका शिक्षकांवर काम सुरु आहे.तसेच तालुका मोठा असल्याने शिक्षक संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव तयार आहेत मात्र त्यांना मागील वर्षाच्या गोपनीय अहवालवर सही करायला पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी असणे आवश्यक आहे.
शिक्षणला पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी मिळावा तसेच शिक्षण विभागत कार्यरत दोन लिपिक आहेत. त्यातील एक वैधकीय रजेवर आहे म्हणून एका लिपिकावर कामाचा लोड असल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत.अन्य विभागाचा एक लिपिक शिक्षण विभागाला वर्ग करावा,असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी बाळासाहेब सोलनकर, जितेंद्र बोराडे, रावसाहेब चव्हाण, अविनाश सुतार, विनोद कांबळे इ पदाधिकारी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here