भिवघाटनजिक अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

0

विटा : भिवघाट नजिकच्या करंजे गावातील हद्दीत खापरगादे फाटा येथील पुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारच्या धडकेत दोन जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री घडला.जखमीं पैंकी गंभीर जखमी बाळासाहेब शिवाजी माने (रा. करंजे, ता. खानापूर) यांचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी वाहन चालक हिंदुराव शशिकांत सूर्यवंशी (रा. करंजे, ता. खानापूर) याच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

विटा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,खानापूर तालुक्यातील करंजे ते भिवघाट रस्त्यावरील करंजे गावचे हद्दीत खापरगादे फाटा येथे पुलावर बुधवारी मध्यरात्री हिंदुराव सूर्यवंशी हा  (क्र.एम.एच .१४ डीटी ०२७६) भरधाव चारचाकी चालवत आला.दरम्यान पुलावरुन जाणाऱ्या दोघांना चारचाकी गाडीने मागून धडक दिली.

 

Rate Card

यात घोडके आणि माने दोघेही गंभीर जखमी झाले. यातील बाळासाहेब माने यांचा उपरादरम्यान मृत्यू झाला.अपघातास कारणभूत ठरला म्हणून हिंदुराव सूर्यवंशी यांच्या विरोधात विटा पोलिसात भादविस कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ एम. व्ही.अँक्ट कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.