65 वीजचोरांवर कारवाई,वायर्स जप्त | महावितरणने येथे केली छापामारी

0
Rate Card

सांगली : कवठेमहांकाळ विभागात महावितरणकडून वीजचोरी विरोधात कडक मोहिम राबविण्यात येते आहे. देशिंग, डफळापूर, कुंभारी, कवठेमहांकाळ, रांजणी या शाखा कार्यालयांतर्गत 65 विजचोरांवर कारवाई करण्यात आली. त्याचे आर्थिक मूल्य 7 लक्ष 56 हजार रुपये आहे. वीज चोरीच्या दंडाची 2 लक्ष 21 हजार रुपये आकारणी करण्यात आली आहे.

वीज वाहिनीवर सर्रासपणे आकडे टाकून वीज चोरी करणे, घर व दुकानासाठी एकाच वीज जोडणीवरून वापर करणे, घरगुती जोडणीवर घरात पाणी शुद्धीकरण व विक्री केंद्र चालविणे, मीटर बायपास करून थेट वीज वापर असे प्रकार कवठेमहांकाळ विभागात आढळून आले.

महावितरणच्या धडक कारवाईचा धसका वीजचोरांनी घेतल्याची प्रतिक्रिया सामाजिक स्तरातून व्यक्त होते आहे. दिवसाढवळ्या थेट वीज वाहिनीवर आकडे टाकून वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण घटल्याची चर्चा ग्रामस्थांमधून रंगली आहे. आता वीज चोरांची खैर नाही. महावितरणकडून  सातत्यपूर्ण मोहीम राबविली जाणार आहे. कवठेमहांकाळ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. संदीप सानफ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी-कर्मचारी ‘वीजचोरीमुक्त कवठेमहांकाळ’साठी परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.