जत,संकेत टाइम्स : तालुक्यातील सर्वात मोठी असणाऱ्या संख ग्रामपंचायतीची निवडणूक बाळासाहेबाची शिवसेना स्वंबळावर लढणार असल्याची माहिता तालुका प्रमुख प्रवीण आवरादी यांनी दिली.
आवरादी म्हणाले,संखचा गेल्या ६० वर्षात अपेक्षित विकास झालेला नाही.पाणी,स्वच्छता, रस्ते,गटारी,विज असे नागरिकांचे प्राथमिक प्रश्न अद्यापही कायम आहेत.मोठे गाव असूनही विकासापासून मागे आहे.हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही युवाशक्ती विचार परिवर्तन पॅनल घेऊन जनतेसमोर जाणार आहोत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सांगली जिल्हाप्रमुख आनंद पवार, संपर्क प्रमुख योगेश जानकर,युवासेना जिल्हा प्रमुख मिलिंदजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ताकतीने ही निवडणूक लढविणार असल्याचेही आवरादी म्हणाले.
यावेळी पॅनल प्रमुख महेश बागेळी,मनोहर पाटील, गुरुबसव बालगाव,शिवलिंग बालगाव, मंजू पुजारी, भीमराव पाटील, गुरुराज पाटील उपस्थित होते.
विकासासाठी जनतेनी साथ द्यावी ; आवरादीविकासात्मक दृष्टिकोन घेऊन निवडणूक लढवत आहे.संखच्या विकासाठी आता परिवर्तन गरजेचे आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासाचे धोरण आहे.ते ग्रामीण भागापर्यत विकास योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी अग्रही असतात.त्यामुळे संखच्या जनतेनी आम्हाला साथ द्यावी,असेही आवरादी म्हणाले.




