सुभाषराव गायकवाड सोमवारी थेट संरपचपदासाठी अर्ज भरणार

0

डफळापूर : ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार स्थितीत आली असून गावाचे जेष्ठ नेते,समाजसुधारक सुभाषराव गायकवाड हे थेट संरपच पदाची निवडणूक लढविणार आहेत.त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत अखेर निवडणूक लढविण्याचे निश्चित झाले आहे.उद्या सोमवारी ते मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.त्यांनी उमेदवारीची घोषणा केल्यापासून त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.गेल्या चार दशकाहून जास्त काळ डफळापूरच्या राजकारणात ते सक्रीय आहेत.गावाला तब्बल ६ एकर जमीन मोफत त्यांनी दिली आहे.ग्रामपंचायत कार्यालय,शाळा,तलाठी कार्यालय,सरकार दवाखाना,जनावरांचा दवाखाना,सोसायटी,अंगणवाडी,एसटी पिकअप शेड अशी अनेक कार्यालये या जागेवर उभी आहेत.

 

 

त्याशिवाय ते सातत्याने दिनदुबळ्यांना मदत करत आहेत.मंदिरे,सामाजिक कार्यक्रम,विविध समाजासाठी कुपनलिका खोदून देणे,मंदिरांचे जीर्णोद्धार करणे,विविध क्षेत्र यशस्वी झालेले विद्यार्थी, नालौकिक मिळविलेले तरूण,नागरिकांचा गौरव करून त्यांनी कौतुकाची थाप कायम ठेवली आहे.गावाच्या प्रश्नासाठी ते लढत असतात.राजकारणातही ते गेल्या चार दशकाहून जास्त काळ सक्रीय आहेत.दलितमित्र,दानसूर सुभाषकाका ही त्यांची ओळख..शेकडो लोकांना त्यांनी केलेल्या मदतीचे उत्तरदायित्व देण्यासाठी हे लोक सुभाषकाकांनी संरपच पदाची निवडणूक लढवावी म्हणून विंनती करत होते.त्यांच्या‌ विंनतीला मान देवून अखेर सुभाषकाका ग्रामपंचायतीच्या रणागंणात उतरले आहेत.गत पंधरा दिवसापासून त्यांनी गावातील घरोघरी जात नागरिकांची भेटी घेत मते जाणून घेतली आहेत.त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Rate Card
मला मोठा पाठिंबा,विजय निश्चित ; सुभाषराव गायकवाड
डफळापूर गावासाठी आम्हच्या कुंटुबाने मोठे योगदान दिले आहे.गावातील अनेक कुंटुबांच्या सुख:दुखात आम्ही मदत करत असतो.लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी मी गेली चार दशके काम करत आहे.गावाच्या विकासाठी मी ही निवडणूक लढवत आहे.आम्ही सातत्याने लोकासाठी काम करत आहे.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांचे प्रंलबित प्रश्न सोडविण्यासाठी मला मतदारांनी साथ द्यावी,असे आवाहन सुभाषराव गायकवाड यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.