संख,संकेत टाइम्स : जत तालुका सिद्धनाथ येथील नागरिक सर्वजण कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहेत.गावातील नागरिकांनी कर्नाटकचे झेंडे व गळ्यात मफलर घालून पदयात्रा काढण्यात आले पूर्व भागातील सिद्धनाथ येथील ग्रामस्थांनी कर्नाटकाचा ध्वज घेऊन सिद्धेश्वर मंदिर समोरुन बसवेश्वर चौक पर्यंत पदयात्रा काढली.कर्नाटक सरकार चे गोषणा देण्यात आले.
सिद्धनाथ गावापासून २ किलोमीटर अंतरावर बिजापूर जिल्हा आहे.कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तालुक्यातील ४२ गावे समावेश करून घेणार असल्याचे सांगितले.कर्नाटक सरकाराने तीन वर्षांपासून तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी तलावात सोडले आहे. कर्नाटक सरकार वेगवेगळ्या सुविधा व अनुदान देते.तर महाराष्ट्र सरकार म्हैसाळचे पाणी देतो म्हणून गेली ५० वर्षांपासून निवडणूक लढवित आहे.पाण्याचे गाजर दाखविण्याचे काम केले आहे.आम्हाला महाराष्ट्र सरकार कोणतेही सुविधा देत नाही.सिद्धनाथ हे महाराष्ट्र असून येथील,उच्च शिक्षण घेण्यासाठी सांगली, पुणे जावे लागते.तर कर्नाटकचे सिद्धनाथ चार बस तर महाराष्ट्र चे दोन बस, म्हैसाळ पाणी वंचित,असे अनेक समस्या त्यामुळे कर्नाटकात जाण्यासाठी महाराष्ट्र सरकार एनओसी द्या असे आंदोलनकर्तांनी सांगितले.
यावेळी सिद्धनाथ चे सरपंच बिरजू महादेव शिंदे, उपसरपंच बसगोंडा रावसाहेब पाटील,माजी पंचायत समिती सदस्य पी. एम. माळी,सिध्दु ईनामदार, नागराज पाटील,रमेश बिद्री, संजय खिळेगाव, परमेश्वर पाटील,संजय शिंदे,गौडाप्पा बिळूर, ज्ञानेश्वर माळी, उपस्थित होते.
सिद्धनाथ (ता.जत) येथील ग्रामस्थांनी कर्नाटकाचा ध्वज घेऊन पदयात्रा काढली.