कवठेमहांकाळ येथे महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी
कवठेमहांकाळ : सत्यशोधक समाजाचे शिल्पकार संस्थापक,परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करणारे एक यशस्वी उद्योजक,शेतकरी,लेखक,छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेणारे व पोहाडा रचणारे आद्यशिक्षक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी कवठे महांकाळ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १३२व्या स्मृतिदिनानिमित्त कवठे महांकाळ येथील प्रभाग क्रमांक १६ मधील समाज मंदिर येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.यावेळी जीवक सुनील वाघमारे आणि सूर्या सचिन वाघमारे यांची पासिंग हॉलिबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झाल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन ज्युली वाघमारे,शुभांगी वाघमारे,ज्योती वाघमारे,सुषमा साबळे,रुपाली माने यांनी केले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कवठे महांकाळ शहराध्यक्षा मीनाक्षी माने,युवानेते नानासाहेब वाघमारे,डॉ.हर्षला कदम,श्री.महांकाली हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील भोसले,बौध्दाचार्य बुध्दा ओहोळ हे उपस्थित होते.या सोबत क्रीडाशिक्षक अशोक पाटील,तानाजी थोरात,किशोर दिपंकर,शुभम कोरे,सरफराज सावणूरकर,अभिजित माने,विशाल वाघमारे,नूतन वाघमारे,नगरसेवक संजय माने,नगरसेवक संजय वाघमारे, बबुताई वाघमारे,रजनी वाघमारे,सुप्रिया बनसोडे,वंदना माने,लता माने तसेच युवक,युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
