जत तालुका ओबीसी संघटनेचेवतीने महात्मा फुले यांना अभिवादन

0
जत ;  जत येथील सातारा रोडवरील नदाफ मल्टीपर्पज हॉलमध्ये जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने महात्मा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.प्रारंभी प्रा. पांडुरंग वाघमोडे यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना प्रा.पांडूरंग वाघमोडे म्हणाले की भाषणे ऐकून  सोडून देण्यापेक्षा महात्मा फुले यांच्या विचारावर  संवाद,  चर्चा घडवून आणली पाहिजे आणि त्यांचे विचार अंमलात आणले पाहिजेत.

 

Rate Card
यावेळी त्यांनी सत्यशोधक धर्माचे महत्त्व विशद केले. सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक तुकाराम माळी यांनी केले. यावेळी मुबारक नदाफ, रवींद्र सोलनकर, हाजीसाहेब हुजरे, आनंदराव पांढरे, श्रीकांत माळी, रमेश माळी, सुरज माळी, शिवानंद आरळी, इब्राहिम नदाफ,अर्जुन कुकडे, सरवेस माळी, विजय माळी, ज्ञानेश्वर  माळी, महेश साबळे, श्रीमती श्रद्धा सनमडीकर,भैराप्पा माळी, विनोद माळी, प्रकाश माळी ,दत्तात्रय माळी, सौ.वाघमोडे,  श्री. कदरे आदी  उपस्थित होते. आभार  हाजीसाहेब चंद्रसेन यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.